आपण एक झाड लावलं, म्हणजे संपूर्ण भविष्यासाठी आशेचा अंकुर रोवला

पार्थ सारथी फौंडेशनचा हरित वसा 🌿🌳
“आपण एक झाड लावलं, म्हणजे संपूर्ण भविष्यासाठी आशेचा अंकुर रोवला!”
पार्थ सारथी फौंडेशन, शाळगाव या सेवाभावी संस्थेने गाव आणि परिसराच्या पर्यावरण संवर्धनासाठी एक मोठी आणि प्रेरणादायी मोहिम सुरू केली आहे. यामध्ये बोंबाळेवाडी MIDC परिसर, आराडे डोंगर, शामगाव घाट, पाचूद डोंगर, घुमूट डोंगर आणि शामगाव घाट ते मायणी पर्यंतचा पंढरपूर रोड या सर्व ठिकाणी हजारो झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ही फक्त वृक्षलागवड नाही, तर निसर्गाशी नाते जोडणारी चळवळ आहे.
हे झाडं पुढील तीन वर्षे पाण्याची, देखभाल व संगोपनाची जबाबदारी पार्थ सारथी फौंडेशन आपल्या खिशातून, श्रमातून व तळमळीतून पार पाडणार आहे.
🫱🫲 म्हणूनच आम्ही तुमच्याकडे हात पुढे करतो…
ही लढाई आपल्या सर्वांची आहे. वाढते प्रदूषण, उष्णतेची लाट, कमी होत चाललेली वनराई – यावर उपाय म्हणजे एकत्र येऊन झाडे लावणे आणि ती जगवणे!
🌱 तुमचा हातभार कसा लागू शकतो?
₹100/- दान = 1 झाड, 3 वर्षे देखभाल
स्वतः श्रमदान – झाडे लावणं, पाणी देणं
सामाजिक गट/मंडळांनी सामूहिक दान
शाळा-कॉलेज विद्यार्थी, युवा वर्गांनी पुढे येणे
✅ दान का करावे?
भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ श्वास
गावचा तापमान कमी करण्यासाठी
पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी
पंढरपूर रोडसारख्या प्रमुख मार्गालाही हिरवळ देण्यासाठी
एक झाड – हजारो फळे, सावली, ऑक्सिजन आणि समाधान
पार्थ सारथी फौंडेशन आपल्यासाठी काम करतंय…
आता वेळ आहे – आपण फौंडेशनसाठी काहीतरी करायची!