शाळगावच्या हरित भविष्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची
“पार्थ सारथी फाउंडेशन” च्या हरित मोहिमेला तुमचा हातभार लागो! 🌱🌳
शाळगावच्या हरित भविष्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे!
पार्थ सारथी फाउंडेशन, शाळगाव या संस्थेच्या पुढाकारातून आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने गावात विविध ठिकाणी झाडे लावण्याचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुकुंदराज विद्यालय परिसर, तळीचे मुलांचे क्रिकेट ग्राउंड, गावाबाहेर जाणारे रस्ते (येडे, रायगाव, बोंबालेवाडी, वांगरेठरे, करांडेवाडी, विहापूर, बेलावडे), तसेच आई तुकाई माता मंदिर परिसर, तुकाई देवी डोंगर आणि नाळी येथे ही झाडे लावण्यात येणार आहेत.
या झाडांचे तीन वर्षे पाणी देणे, निगा राखणे आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी पार्थ सारथी फाउंडेशन स्वतः स्वीकारणार आहे. ही फक्त वृक्षलागवड नाही, तर भविष्यासाठी एक हिरवी चळवळ आहे, जी आपल्या मुलांसाठी स्वच्छ, सुंदर आणि शुद्ध पर्यावरण निर्माण करेल.
या उपक्रमात गावातील क्रिकेट टीम्स, गणपती मंडळे, मुकुंदराज विद्यालयाचे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, युवा वर्ग आणि स्थानिक नेते मंडळी सहभागी झाले आहेत. ही एक सामाजिक एकजूट घडवणारी चळवळ आहे.
🟢 आपण काय करू शकता?
आपल्या छोट्याशा मदतीने आपण गावाच्या हिरवळीत भर घालू शकतो. प्रत्येक नागरिकाने एक झाड दान करणे, त्यासाठी आर्थिक मदत करणे, किंवा श्रमदान करणे – यातूनच या उपक्रमाला बळ मिळेल.
✅ का दान करावे?
आपल्या गावासाठी
आपल्या मुलांच्या भविष्यासाठी
स्वच्छ हवा, सावली आणि पर्यावरण रक्षणासाठी
गावाच्या सौंदर्य वृद्धीसाठी
💚 एक झाड = हजारो श्वास
आजच पुढे या, पार्थ सारथी फाउंडेशनच्या या हरित यात्रेत सहभागी व्हा.
दान करण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी संपर्क करा